तूळ राशी
तूळ राशी
1 min
233
डोळ्यावर पट्टी जरी यांच्या
अगदी चोख करती न्याय ही
समतोल हे उत्तम साधती
ही तर तूळ राशी
रसिकता स्वभावात जरी
वेळप्रसंगी होते कठोर ही
सात्विक असे यांची वृत्ती
अशी ही तूळ राशी
वायू तत्वाची बनली तूळ
जगते पहा सन्मानाने
न्यायप्रिय अन कर्तबगार
असते तूळ राशी
असतात गुणी व्यवहारी
उमेद यांच्या बोलण्यात
बुद्धि अन चातुर्याने
मनं जिंकते तूळ राशी
