तूझ्या नसण्याने फरक पडतो
तूझ्या नसण्याने फरक पडतो
का कुणास ठाऊक असाच कळत नकळत
कोणावर तरी अफाट जीव जडतो
सारी दुनिया नसली तरी पर्वा नाही
तुझ्या एका नसण्याने फरक पडतो ||धृ||
तूझ्या सहवासाची राहून राहून कमी जाणवते
आसुसलेल्या डोळ्यात आसवांची नमी जाणवते
सतत शोधत राहते नजर तुला अवतीभवती
हृदयात फक्त तुझ्याच प्रेमाची उर्मी जाणवते
कसं समजावू या जीवाला
जडला तुझ्यावर, तुझ्याचसाठी तडफडतो
सारी दुनिया नसली तरी पर्वा नाही
तूझ्या एका नसण्याने फरक पडतो ||1||
स्वप्न माझं खरं होईल की तुटेल माहित नाही
तुझंच रूप दाखवतात या दिशा दाही
तो निर्मिक जाणतोय अवस्था माझी
त्याच्या पासून खरंच लपलं नाहीए काही
हास्याचा मुखवटा लावलाय सर्वांसमोर
एकांतात मात्र तूझ्या आठवणीत रडतो
सारी दुनिया नसली तरी पर्वा नाही
तूझ्या एका नसण्याने फरक पडतो ||2||
तू नसताना सारं काही नकोसं वाटतं
हृदयात तुझ्याप्रती अव्यक्त प्रेम दाटतं
कधी व्यक्त होतील का माझ्या भावना
अशाच विचारांचं क्रूर भय साठतं
हृदय नावाचा अवयव कितीही समजावलं तरी
तुझ्याच आठवणीने सतत धडधडतो
सारी दुनिया नसली तरी पर्वा नाही
तूझ्या एका नसण्याने फरक पडतो ||3||
तुझंच प्रतिबिंब सतत डोळ्यात असावं
वाटतं तुझ्याशिवाय हे जगणंच नसावं
साऱ्या जगाला विसरून फक्त
तासनतास तुलाच बघत बसावं
तुला कळेल का कधीतरी
असाच प्रेमाचा इतिहास घडतो
सारी दुनिया नसली तरी पर्वा नाही
तुझ्या एका नसण्याने फरक पडतो ||4||
तुला भेटल्यापासून हे जग सुंदर जाणवू लागलंय
यातील प्रत्येक सुख आता मला खुणावू लागलंय
दुःखाला आता इथे थाराच नाही
हे हृदय आता एक नवीन बाग फुलवू लागलंय
चेहरे करोडो आहेत या जगात
मला एक तुझाच चेहरा आवडतो
सारी दुनिया नसली तरी पर्वा नाही
तूझ्या एका नसण्याने फरक पडतो ||5||
