तूच त्यांची उत्तरे
तूच त्यांची उत्तरे
1 min
11.8K
आठवांचा प्रेम ग्रंथी, आसवांची अक्षरे
तुझेच रूप त्यामध्ये एक मोरपीस रे
अथांग हे गगन निळे
रूप तुझे भासते
होवूनी मी चंचला
प्रिया मीच नाचते
प्राणातुनी अश्रुतूनी तूच एक तूच रे
आठवे तुझी मिठी
आठवे तुझी दिठी
या जगात सांग मला
शोधू रे तुला किती?
श्वासा च्या परीमळात फिकी पडोत अत्तरे
सहज चालता पाने
सतावती मला स्मृती
आसवांच्या अक्षरात
प्रेम कथा भिजली ती
प्रश्न जे छळती मना तूच त्यांची उत्तरे
