तूच दुर्गा तूच काली
तूच दुर्गा तूच काली
1 min
289
तूच दुर्गा तूच काली तूच सर्व शक्तिशाली
दृष्ट संपवण्या हेतु घेत अवतार आली
शुंभ निशुंभ दानव सहारुन पाठविले
यम सदनी भक्तांच्या करी रक्षणा धावली
कलियुगी हे विषाणू आहे ठरले दानव
एक कर तु नीपात ठेव भक्ताची जाणीव
मनोभावे पुजतात भक्त त्यांना समजावे
तेच संकटि पडता त्यांना हाती ही धरावे
