तू येण्याची खंत
तू येण्याची खंत
सांग राहसी नभात का रे?
विस्मृतीत माझ्या ध्यास तुझा आहे
गंधाळलेल्या फुलांना गंध तुझा आहे
तुला बोलण्यास सांग कोणते शब्द वापरू
तुझ्या येण्याची खंत ह्या मृगजळास आहे
तिथे राहून काय तू करतोस
अरे वेड्या, आज गरज तुझे इथे आहे
आठवतात मज तुझ्या त्या बरसणाऱ्या सरी
विरहात त्या मज मधुमास जणू वाटे
दिले वचन तू मला बरसणाऱ्या तुझ्या सरीचे
हवे तर त्या चंद्राची साक्ष तुज समोर आहे
कधी लहरी तर कधी हट्टी असा तू आहे
कधी जोरात तर कधी दुष्काळी
असा बरसतो तू तुझी झलक तू अशी दावतो
कधी थोडे ऊन तर कधी तुझे अवचित बरसणे
हा तुझा अवतार आम्हास त्याची सवय आहे
सांग मला तू राहतोस त्या निळ्या नभात
अरे ती सांज पण करते तुला विनवणी
कळते सारे मला पण गुंतत जातो तुझ्यात
सांग तरी तू आता मज का राहतो तू त्या नभात
