तू गृहिणी घराची
तू गृहिणी घराची
जन्मली तु घरी साऱ्यांच्या त्या सुखासाठी,
वसा घेतला सारा तीने आपल्या कुटुंबांसाठी...१
दुःख आपले लपवून सुख या जगा दाखवले,
स्त्रीचे त्या कर्तृत्व ना इथे ते कोणा समजले....२
आधार बनूनी घराचा तेवत ठेवला तू दिवा,
दोन्ही घर जोडूनी झाली तू जोडणारी दुवा...३
गृहिणी तू या संसाराची जपली सारी नाती,
साऱ्यांना जपताना नाही कधी बदलली मती...४
नि:स्वार्थ भावना तू तुझ्या मनी ती रुजवली,
गृहिणीची तुळस तू या अंगणी ती सजवली...५
जीवनाचे सारे या धागे-दोरे प्रेमाने ते बांधले,
नात्यापलिकडचे रेशमी बंध सुखाने गुंफले...६
आई होऊनी साऱ्या घराचे ते सुख दिले तू,
जपता तू साऱ्यांना जन्म तुझा वाहिला तू....७
आयुष्याचा संघर्ष लढवण्यास तु जगा शिकवले,
कुटुंबाचे सुख आपल्या देहात हे साऱ्या सामावले...८
संसारकर्ती होऊनी झाली तू प्रतिकृती त्या देवीची,
आनंदाचे झाड फुलवूनी झाली तू गृहिणी घराची..९
