तू गेल्यावर...
तू गेल्यावर...
1 min
17.5K
तू गेल्यावर हरवले गाणे
तू गेल्यावर विरले तराणे
तू गेल्यावर हरवला सूर
चेहऱ्यावरचा बदलला नूर
तू गेल्यावर बदलल्या गोष्टी
आनंदी ना, दिसते दुःखी, कष्टी
तू गेल्यावर संपले सारे
हवेतल्या हवेत हरवले वारे
तू गेल्यावर संपले संगीत
बेरंगी आयुष्य, ना रंगीत
तू गेल्यावर हरवली संस्कृती
उरली फक्त जीवघेणी विकृती
तू गेल्यावर तुझी सतावते याद
मनाला लागतो फक्त तुझाच नाद
तू गेल्यावर उडाले अंगणातले पक्षी
आकाशावरची पुसून गेली नक्षी
तू गेल्यावर मरून गेले मन
विरह आगीत जळून गेले तन
तू गेल्यावर मी माझी ना उरले
तू गेल्यावर मी तरी कुठे जगले ?
