तू अस असावं
तू अस असावं
1 min
270
मी वेल असावं
तू मला आधार देणारी
भक्कम अशी भिंत असावं
तुझ्या सोबतीने मी त्यावर बहरावं
मी दिवा असावं
तू त्यातली प्रज्वलित
सदा तेवणारी वात असावं
आणि आपण सारं काही तेजोमय करावं
मी वटवृक्ष असावं
तू त्याच्या वाढलेल्या
पारंब्या असावं
मुळाशी नातं आपण अगदी घट्ट धरावं
मी वाहत पाणी असावं
तू सोबत वाहत जाणारा
प्रवाह असावं
किती जरी वळणं आली तरी कायम आपण एकत्र रहावं
