तू आणि मी
तू आणि मी

1 min

155
तू आणि मी
तुझ्या मिठीत हरवून जावं
असं नेहमीच वाटतं मला
मात्र ओढ आहे का रे तुला?....
तुझ्या डोळ्यात पाहिलं की
प्रेम जाणवते बर मला
याची जाणीव आहे का रे तुला?...
तुझ्या स्पर्शात जादू आहे
रांगडा स्पर्श भुलवतो मला
माझा मऊस्पर्श आवडतो का रे तुला?...
मनातले सारे सांगावे वाटते
खूपच मनापासून रे मला
मी मन मोकळे केलेले आवडेल का रे तुला?...
स्वप्नात रोज येतोस अन
नेहमीच छळतोस रे मला
भावना माझ्या समजतील का रे तुला?...
वसुधा नाईक, पुणे