तू आणि कविता
तू आणि कविता
तु नेहमी म्हणतेस
मला तुझी कविता खूप आवडते..!
आणि तुझं हे एकच वाक्य मला
पुन्हा लिहायला भाग पाडते..!!
मी कविता लिहायला बसतो
पण शब्दाआधी तूच आठवते..!
प्रत्येक शब्दांत तुझं गोड हसू
अन तुझाच भास असतो..!!
तु माझ्या कवितेत नेहमी
स्वतः ला शोधत राहते ..!
मी मात्र प्रत्येक भावनेत
तुझ्यावर कविता बनवतो..!!
कधी तुझं रुसणं लिहतो
कधी तुझं हसणं लिहतो..!
कधी सात्विकता , सोज्वळता
तर कधी तुझं शांत राहणं लिहतो..!!
माझ्या लेखणीला शब्द मिळतात
जेव्हा तुझी आठवण येते..!
आणि माझ्या कवितेला अर्थ मिळतो
जेव्हा तु ती कविता पाहून हसते..!!
मी कविता लिहत नाही
तूच माझ्यात कविता जगवते..!
आणि नकळत माझ्या कवितेची
सुंदर ओळ बनून जाते..!!
