STORYMIRROR

Chandan Pawar

Others

4  

Chandan Pawar

Others

एक स्वप्न तुझ्यासाठी

एक स्वप्न तुझ्यासाठी

1 min
0

तू मिळाली असती तर बरं झालं असतं 
माझ एखादं स्वप्न पूर्ण झालं असतं..!
रिकाम्या या आयुष्याला कदाचित
तुझ्या एका हसण्यात घर मिळालं असतं..!!

तुझ्या नजरेत माझ आभाळ सापडलं असतं
तुझ्या शब्दात माझ जग उमटलं असतं..!
मनातल्या साऱ्या वेदना शांत झाल्या असत्या
तुझ्या एका स्पर्शाने हृदय भरलं असतं..!!

रात्रभर जागणाऱ्या या डोळ्यांना
तुझ्या खांद्यावर विसावण मिळालं असतं..! 
आणि या भटकणाऱ्या जीवाला
तुझ्या प्रेमात कायमचं हरवण मिळालं असतं..!!

आयुष्याची धावपळही थांबली असती
वेळसुद्धा तुझ्याजवळ थांबला असता..!
जर तुझ्या मिठीत मरण आलं असतं 
तर परत जगण्याचा मोहच केला नसता..!!

तुझ्या कुशीत शेवटचा श्वास घेताना
माझ सगळं दुःख विरघळून गेलं असतं..!
कारण या क्षणासाठीच कदाचित
हे संपूर्ण आयुष्य जगणं ठरलं असतं..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन