सागर
सागर
लाल साडी नेसून जेव्हा
तुला फोटोत पाहिली ..!
जणू पहाटेच्या किरणांनी
मनाची धरतीच उजळली।
कपाळावरील ती मोहक बिंदी
गुलाबी गालांवरील सुंदर हास्य..!
पाहताच मन हरवून जाते
असे तुझे स्वर्गीय सौंदर्य खास..!!
दागिन्यांपेक्षा तुझ्या वृत्तीचा
खुलून दिसे आगळा साज..!
साध्या सात्विक, सोज्वळ
भावाचा वेगळाच राज..!!
डोळ्यांत तुझ्या स्वप्नांची
सुंदरशी निराळी दुनिया..!
निर्मळ नजर अन वागण्यातूनच
कळतात मनातील भावना।
लाल रंगाच्या छटांनी
खुलली तुझी काया..!
जणू वसंतानेच सजविली
चेहऱ्यावर फुलासम माया..!!
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरी
जिद्द,विश्वासाचा प्रकाश,
मनाला देऊन जातो
आनंदाचा मंद सुवास..!!
अशीच राहो तुझी
ही प्रसन्नता निरंतर..!
सौंदर्य आणि संस्कारांचा
अखंड वाहो सागर..!!
