सावली
सावली
प्रेम शोधत भटकत होतो
वाटेत मला आयुष्य भेटले..!
तुझ्या एका गोड शब्दाने
आयुष्याचे कोडे सुटले..!!
नव्हती कधी अपेक्षा मोठी
फक्त तुझी सोबत हवी होती..!
तू आलीस आणि जगण्याला
नवी उमेद मिळाली होती..!!
शोधता शोधता प्रेमाला
तूच माझे सर्वस्व झालीस ..!
माझ्या कोऱ्या बेरंगी आयुष्यात
रंगांची उधळण करून गेलीस..!!
आता शोध थांबला आहे
माझी नजर तुझ्यावर विसावली..!
आयुष्याच्या रखरखत्या उन्हात
तुझ्या कृपेची सावली भेटली..!!
तुझ्या रूपाचं आकर्षण नव्हतं
तुझ्या स्वभावानं मन जिंकलं होतं ..!
तुझ्या निर्मळ निरागस हसण्यात
माझं आयुष्य अलगद गुंतलं होतं..!!
प्रेम कधी शब्दांत मांडलं नाही
पण प्रत्येक श्वासात तुला जपलं होतं..!
कारण तुझ्या हातात हात घालून घालून
आख्ख आयुष्य जगायचं ठरवलं होतं..!!
