काळीज
काळीज
1 min
0
तुझ्या भेटीचा तो पहिला क्षण
आजही मनात जिवंत आहे..!
पहिल्याच नजरेत नकळत
हृदय तुझ्यात गुंतल आहे..!!
तुझ्या गोड मृदू हास्याने
मन माझ हरवलं होत..!
तुझ्या एका नजरेसाठी
वेड काळीज झुरत होत..!!
तुझ्यासोबत बोलताना वेळ
कसा जातो कळतच नाही..!
तुझ्या आठवणींशिवाय मनाला
दुसरं काही सुचतच नाही..!!
तुझी वागण्यात एक वेगळीच
आपुलकी दिसून येते..!
मग माझ्या शांततेलाही
तुझीच साथ लाभते..!!
कधी तू सवय झालीस
हे मला कळलं नाही..!
पण तुझ्याशिवाय जगणं
मनाला आता जमत नाही..!!
पहिल्यांदाच कुणावर तरी
मनापासून जीव जडला आहे..!
आणि नकळत माझे सगळ
जग तुझ्यात सामावल आहे..!!
