STORYMIRROR

suvidha undirwade

Others

4  

suvidha undirwade

Others

तुलाही मलाही

तुलाही मलाही

1 min
300


त्या वाटेवरच्या पाऊलखुणा...

दूर जातांना जरी मी पाठमोरी झाले असले, आणि माझ्या पाऊलखुणा मी मागे सोडून आले असले तरीही...

तरीही त्या पाऊलखुणा त्रासदायकच, जशा तुला तशाच मलाही !

माझं परत येणं शक्य नाहीच, पण तुला त्या कायमच्या पुसून टाकणं शक्य आहेच.

पुसून टाक सगळा भूतकाळ त्या पाऊलखुणा समवेत, अन् कोरं कर तुझ्या मनाला,

नव्या आगमनाच्या पाऊलखुणा उमटण्यासाठी !


" तुलाही मलाही "


त्या वाटेवरच्या पाऊलखुणा खुणावतात,

तुलाही मलाही.

तुला माझी ओढ लावून,

अन् मला परतीची साद घालून हिनवतात,

तुलाही मलाही.

सांग त्यांना, 

मी नाही येणार परतूनी.

माझ्या आठवणीत अश्रू ढाळून,

नका त्रास देऊ,

तुलाही मलाही.

पुसून टाक त्या मी मागे सोडून गेलेल्या,

तुला दुखावणाऱ्या पाऊलखुणा.

अन् सांग त्यांना, 

जगू द्या हे आयुष्य आनंदाने,

तुलाही मलाही


Rate this content
Log in