तुला प्रेम कसे दाखवू?
तुला प्रेम कसे दाखवू?
चंद्र, सुर्य अन् तारकांच्या मधला
आहेस तू आमचा
अढळ, उत्तुंग तेजस्वी 'ध्रुवतारा'...
निरागस, अल्लड तुझ्या मनाला
शिवला ना आजवर कधी
जगाचा 'व्यवहार वारा'...
मोठं होऊन म्हणशील
जर कधी काही आठवू,
त्यासाठी सांग ना आज
आम्ही आमचे प्रेम तुला कसे दाखवू?
दिलानं दिलदार तू
अन् मनानं भावूक
दोन गोड शब्दांवरही
कसा काय भाळतोस
तुझं तुलाच ठावूक!
निखळ हास्याचा सागर
मैत्रीसाठी सदैव खुले
तुझ्या दिलाचे आगर
यश शिखरावर खिळवून नजर
केलीस सफल वाटचाल त्यावर
उदंड आयुष्य लाभो तुला
असेल जे सुंदर आणि सफल
चांगल्या कर्माचे नेहमीच
मिळो तुला जीवनात मधुर फळ
