तुला पाहते रे
तुला पाहते रे
1 min
218
प्रातःकाळच्या गर्द धुक्यांत सख्या
पर्णांवरच्या या दवबिंदूंत तुला पाहते रे
रविच्या आगमनाने धरती ही तेजाळली
या सोनेरी किरणांमध्ये तुला पाहते रे
नाद मंजूळ कोकिळेचा मनास छेडतो रे
स्वरांच्या त्या लयीत तुला पाहते रे
बेधुंदपणे बरसतात श्रावणसरी रे
नभीच्या इंद्रधनुच्या रंगात तुला पाहते रे
माझेच प्रतिबिंब आरशात पाहते रे
पण मनाच्या दर्पणी तुला पाहते रे
राञी नभात चांदण्या चमकतात रे
पौर्णिमेच्या चंद्रात तुला पाहते रे
