STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

तुला पाहताना

तुला पाहताना

1 min
181

तुला पाहताना

मन मोहरते

तनू शहारते

वसू बावरते....


देखणा रांगडा

सजना तू असा

मजवरी जीव

आहे तुझा खासा....


चल फिरायला

बागेमधे जावू

मस्त पाणीपुरी

प्रीतीत रे खावू....


सिनेमाला जावू

हाती हात घेवू

धूंदीत सिनेमा

मस्तीत रे पाहू....


जवळ तू हवा

वाटे मज सदा

नको दूर जाऊ

नको सोडी कदा...


संसार फुलवू

रममाण होवू

मुलाबाळात रे

आनंदात राहू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन