तुला झालेला उशीर....
तुला झालेला उशीर....
संध्यकाळी तुजा मेसेज आला
ऑफिस मीटिंग आहे होणार आहे उशीर .मला .....
तू जेवून घे वेळेवर जरा .....
हिरमुसलं माझं मन तुजा मेसेज पाहून ..
ठरवली होती मी स्पेशल डिश तुज्यासाठी पुस्तकात वाचून ...
कॅन्सल केला प्लॅन डिश चा ....
सरळ घेतला एक कप कॉफीचा .....
कॉफी पण आज जास्त कडू लागली ......
तुज्या नसण्याची तिला पण वाटत खबर कळली .....
जेवणाची वेळ होत आली तरी भूक नव्हती मला लागलेली ....
नेहमी जेवण होई आपले एकत्र ....
आज तुज्या नसण्याने कसा जाईल माझा घास पोटात ....
तुज्या असण्याने असतो एक बहार ....
नाही तर कंटाळवाणा वार .....
रात्रीचे दहा वाजले तरी नव्हता पत्ता तुजा ....
फोन करावा तर नको डिस्टर्ब तुला ....
तशीच मी बसले सोफ्यावर .....
आता डोळा होता तुज्या वाटेवर .....
हलकीशी मला डुलकी लागली ....
तुज्या गाडीच्या आवाजाने मला जाग आली ....
पटकन मी उघडले दार ....
होतास तू माझ्या समोर फार ...
तुला पाहताच मन गुणगुणु लागलं ...
मघास पासून रुसलेले मन अधिक खुलून दिसलं .....
तुला झालेला थोडासा उशीर मात्र खूप वर्ष निघून गेल्यासारखी दिसलं .....
.
