तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे
1 min
11.9K
अविरत तुझ्या आठवणींचे पहारे
श्वासागणिक तेच धुमारे!!!
मज स्पर्शून जाता वारे
तुझेच आभास का रे??
ती कातरवेळ सतावेल का रे
तू हवास म्हणून हट्ट धरेल ना रे!!!
नभीचे चंद्र आणि तारे
मज भासतील बिचारे !!
मिटतील कधी आपुल्यातील अंतरे
नियतीचे हे खेळ झाले आता पुरे!!
