तुजवीण शून्य
तुजवीण शून्य
1 min
161
गुंतले श्वास एकमेकात
तोल जरा सावरू दे
बावर्या या मना आता
चांदणी रात्र बहरू दे...
ओंजळीत झाकोळला चेहरा तुझा
पाहून हृदयी झंकार छेडली
पाव्यातील सप्त सुरांनी
प्रीतीची गीते धुंदीत गायिली...
पुनवेची बेधुंद रातीला
सोबत सजणा साथीला
दोघांचा प्रणय सुरू जाहला
शीतल चांदव्यात फुललेला...
सजणाच्या भरदार छातीवर
सजणी मस्त विसावली
बघा चांदण्या रातीला
मधाळ प्रीत छान धुंदावली...
तुजवीण शून्य मी सख्या आता
जीवनातील श्वास तू आहेस माझा
सुखदुःखे सारी तुझ्याच समवेत जीवनी
घेतला हात हाती सोडणार नाही तुझा...
