तुझ्याशी बोलण्यासाठी आणला
तुझ्याशी बोलण्यासाठी आणला
तुझ्याशी बोलण्यासाठी आणला
नवीन मोबाईल उरात होतंय माझ्या
धगधग तू रिंग वाजल्यावर आजूबाजूला
बघ नाहितर लपवून आणलेला घरीं
पकडला जाईल......!
आपल्या मनात असणार बोलणं ऐकून
माझ्या जीवाला बरं वाटलं भेट अशीं
तुझी होत नाय पराकष्ट करून मिळवलाय
तरी तुला त्याचं काय वाटतं नाय.....!
त्यात काय नवल तुझचं कौतुक
दिवस रात्र तुझीच काळजी
जेवायला काय करु भाजी
नाहीं तर कर कांदा भजी
पटक्यान बनव राहील उपाशी
घरी येईल शेतातून भाऊजी........!
घरची गेल्यात देवाला वाईट नको वाटून
घेऊ मनाला आज आहेत मुक्कामाला
तो पर्यंत राखणदार आहे घराला
एस मस एस कर मला काय टाईप केलं
कळत नाही अडाणीला घरी फ़ोन चा
आवाज आल्यावर बंद करायला सांगू कुणाला....
आई घालल चुलीला धूर जाईल तुझ्या नाकाला
शक येईला सासऱ्या ला शिंक ऐकू जाईल गावाला
चर्चा सुरु होईल पाटलाच्या पोरीचं कळलं सरपंचाला
हाकलून देतील भावी जावयाला एवढ केलेलं प्रेम
कळून जाईल पारावरच्या लोकांना.....!
कसा वाटला मी गिफ़्ट दिलेला मोबाइल तुला
काढून दाखव एकदा तुझा सेल्फी मला आनंद
खुपचं स्वस्तात पहिल्या पगारात तुला आणला.
एकदा हंस बघु किती छान वाटतं माझ्या मनाला
आता लाग घरच्या कामाला आठवण होइल
तेव्हा लाव फोन मला खरंच इतकं प्रेम
करतो या अडाणीला किती समजून
घेशील मला......!
