STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

तुझ्या प्रेमात

तुझ्या प्रेमात

1 min
252

वाट बघत तुझी मी उभी आहे बागेत 

प्रीतीत तुझ्या मी ही आहे रांगेत 

कधी भरशील रे तु कुंकू माझ्या भांगेत


किती जीव आहे माझे तुझ्यावर 

तु भेटशील तेव्हाच ना मी तुला सांगेन 

बघ एकदा तरी येऊन तु म्हणशील तशीच वागेन 


तुझ्या प्रेमात कधी पासून आहे मी दिवाणी 

कर माझ्या घरातून तु मला रवाणी

जाईल वाया वाट तुझी बघण्यात माझी जवानी 


माझ्यावर तूझ्या प्रेमाचा हक्क गाजव

तुझी नवरी म्हनून मला तु सजव

चल लग्नाच बँड बाजा लवकर वाजव


दे हाक मला प्रेमाने माझी प्रीत आहे नावात 

तुझ्या माझ्या प्रेमाचे चर्चे सुरू झाले गावात 


आता माझं नाव तुझ्या नावाशी जुळल

तुझं माझं प्रेम सर्वांना कळलं 

तरी अजूनही तु माझं मळवट नाही भरलं 


तुझा हात दे माझ्या हातात 

उगाच नाव होईल माझं बदनाम तूझ्या प्रीतीत 

माझ्या बापाचं लाज जाईल माझ्या जातीत 


Rate this content
Log in