STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

तुझ्या नि माझ्या नात्यात

तुझ्या नि माझ्या नात्यात

1 min
11.8K

तुझ्या नि माझ्या नात्यात

कधी हसलास ,कधी रुसलास तू

समजुनी घेत माझ्या मनाला

माझी भावना झालास तू


तुझ्या नि माझ्या नात्यात

कधी मुरलास,कधी झुरलास तू

ओळखूनी माझ्या मनाला

माझी शांतता झालास तू


तुझ्या नि माझ्या नात्यात

कधी बोललास,कधी शांत राहिलास तू

साद देत माझ्या शब्दांना

माझी कविता झालास तू


तुझ्या नि माझ्या नात्यात

कधी गहिवरलास,

कधी सावरालास तू

अर्थ देत माझ्या जीवनाला

माझा सखा धनी झालास तू...................


Rate this content
Log in