STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

तुझ्या डोळ्यातल्या कोपऱ्यात ..

तुझ्या डोळ्यातल्या कोपऱ्यात ..

1 min
430

तुझ्या डोळ्यातल्या कोपऱ्यात 

मीच माझी जागा करून घेतलीय

मिटल्या पापण्यांचा करु नकोस खुलासा...

मी अंधारालाच मिठी मारुन बसलेय

येतही असेल शहारलेला शहारा कधी

पण माझ्याइतक ते कुणाला नाही कळलयं

तुझं स्वप्नघर असेलही आकाशाएवढं.......

त्यातही मीच चोरुन उडावं

याचही भान ठेवलयं

कधी वाटतं खेचून आणावा

आठवणीतला तो दिवस

पण काही दिवसांना न आठवण्याकरता...

मीच आठवणीत त्यांना बांधून ठेवलयं..

तुझ्या वाटेवरच्या संथ वार्याला

ओळीतल्या शब्दांनी माळुन घेतलयं

तू शब्दांच्या गजर्यात गंधाळलेला..

माझ्या वाटेतलं नसलेलं अस्तित्व 

असण्यापरी जपुन ठेवलयं...

डायरीच्या पानातलं माझं झालेलं 

पिंपळपान...

अजुनही हिरवकंच नि चकाकुन हसतय...

माझ्या डोळ्यातला प्रत्येक कोपरा 

रिकामा भासही जिवंत भासतोय.


             


Rate this content
Log in