STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

तुझ्या बोलण्यावर मी फसले आहे

तुझ्या बोलण्यावर मी फसले आहे

2 mins
374

तुझ्या बोलण्यावर मी फसले आहे

चार चौघांनी घरीं विचारले आहे

नवीन मुलगा तुझ्या सोबत का

फिरत आहे....!


त्याच्यावर माझा विश्वास जडला आहे

त्याचा कॉलेजचा आज पहिलाच

दिवस आहे.काय करू एकाच नजरेत

ओळख झाली आहे. कॉलेजचं तास

बुडवून बुलेट वर फिरत आहे......!



तुझ्या सांगण्यावर घरांत तु मोबाईल

दिला हे कळुन सुद्धा न देता अपरात्री

तुझ्याशी चॅटिंग करत आहे.कारण

तु बिल भरतो म्हणून सेटिंग फुल्ल

देत आहे......!



रोज सकाळी उठल्यावर तुझा

मिसकॉल पाहून घरी खोट

बोलून झणझणीत मिसळ चा

आस्वाद घेऊन तुझा हात न

सोडता घायाळ संवाद साधत

आहे.....!



तु खरंच किती दिलदार आहे.

तु किती माझ्यावर प्रेम करत आहे.

तु मला पाहिजे ते मिळवुन देत आहे.

तु खरंच माझी तारीफ करत आहे.

मला वाटतं नाहीं तु फक्तं फुस लावत आहे....!



एक दिवस मित्रांसोबत सिनेमा पाहिला गेलो.

अचानक ती गावातील मुलाबरोबर दिसली आहे.

माझा वापर करून हिने मला भिकारी केलं आहे.

 का ?

तर हिच्या गोऱ्या रंगावरून माझी उधारी कोण देणार आहे.

मित्रांनी सुध्दा सांगितले होते. नको तिच्याशी

राहूं त्याने कुठे ऐकलं आहे.....!



घरातून पैसे घेऊन तिची हौस केली आहे.

आज ती पळून गेली आहे. तिच्या घरच्यांनी

माझ्या कडे विचारणा करून माझ्या घरच्यांनी

मला हाकलून दिलं आहे....!



   काय माझं नशीब इतकं वाईट आहे.

तिने गाववाल्याच पोरगं गाठलं आहे.

    इतका मोठा धोका दिला आहे.

    माझ्या घरच्यांनी टाळा ठोकला आहे....



तुझ्या बोलण्यावर मी फसलो आहे.

चार चौघांनी घरीं विचारले आहे.

नवीन मुलगा तुझ्या सोबत का

फिरत आहे....!



तुझ्या पायीं माझ्या मित्राने सुध्दा

माझी साथ सोडली आहे.

भाड्याच घर खाली

करायला लावले आहे....!



तुझ्याशी गाववाल्यानी लग्न करून

तूझी जमीन हडप केली आहे.

तुला घटस्फोट देऊन

तुला घरी सोडून दिले आहे....!



शेवटी तूझी सुध्दा फसवणूक झाली आहे.

तुला सुध्दा सुटी दिली नाही ये.

एका हाताने केले आहे

दुसऱ्या हाताने फेडायचे आहे ये...

तु एकटीच का लोकांना

दगड मारत आहे...


ती वेडसर झाली आहे.

घरचे शोधाशोध घेत आहे.

कोणत्या जन्माचं

पाप हे माझ्या वाट्याला आलं आहे.....!



तुझ्या बोलण्यावर मी फसले आहे

चार चौघांनी घरीं विचारले आहे

नवीन मुलगा तुझ्या सोबत का आहे.

मला काय माहीत

माझ्या सोबत असं होणार आहे....!



जाऊदे सोड आता हे सगळं.

प्रेम ब्रेम कांही खरं नसतं

 हा नुसता मनाचा खेळ आहे

निव्वळ टाईमपास आहे...!



तुझ्या बोलण्यावर मी फसले आहे

चार चौघांनी घरीं विचारले आहे

नवीन मुलगा तुझ्या सोबत का

फिरत आहे....!



Rate this content
Log in