तुझ्या भेटीची ओढ
तुझ्या भेटीची ओढ
1 min
232
तुझ्या भेटीची ओढ देवा
मनाला ह्या नित्य लागली
आहेस कुठे तु?या क्षणाला
अवस्था ही दयनीय झाली//१//
सुचेनासे झाले, आता काही
बेचैन झाले आहे मनपाखरू
आतातरी धाव देवा लवकर
कासावीस झाले, तुझे लेकरू//२//
का आटविलास दयेचा सागर
कशी रिती आशीर्वादाची घागर
आता गरज खरी चमत्काराची
आस लागली तुझ्या भेटीची //३//
मी पामर दयेचा भुकेला
ध्यान करतो, स्मरतो तुला
दया, क्षमा शांती तुजपाशी
तरी का? नाहीं तु आम्हापासी//४//
