STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

तुझंच प्रेम भावलं

तुझंच प्रेम भावलं

1 min
12.1K

तुझ्यापासून दूर असताना 

मनाला खूप समजावलं 

ओढ तुझी वाढत गेली 

तुझंच प्रेम भावलं ||0||


तूझ्या आठवणींच्या सागरी 

चिंब चिंब नाहलो मी 

तृष्णा तुझी वाढता वाढता

इतका अधीर जाहलो मी 

मन सतत वेडं होऊन 

तूझ्या दिशेने धावलं 

ओढ तुझी वाढत गेली 

तुझंच प्रेम भावलं ||1||


समजूत काढली माझ्या 

अल्लड मनाची सवडीने 

तुलाच हृदयात सजवलं 

माझ्या मनाच्या आवडीने 

सारं जग पाहीलं मन 

तूझ्याकडे सरसावलं 

ओढ तुझी वाढत गेली 

तुझंच प्रेम भावलं ||2||


इतकं सोपं नसतं इथे 

प्रेम निभावून नेणं 

निसर्गाची देणगी ही 

परमेश्वराचं लेणं 

पाहिलं तुला पहिल्या नजरेत 

मन माझं धजावलं 

ओढ तुझी वाढत गेली 

तुझंच प्रेम भावलं ||3||


Rate this content
Log in