तुझं प्रेम
तुझं प्रेम
1 min
424
तु बोलताच वाटे
आला पाऊस भरून
गगनात उजळलेल्या रविला
मेघांनी घेतले झाकुन
कौतुक करुन माझे
मज ओलेचिंब तु केलेस
प्रफुल्लीत करुनी मनाला
ओंठांवरती हसु तु दिलेस
ओठांत शब्द येउन
स्वर ही मुके झाले
ओतुन भाव माझे
गीत तुझ्यासाठी रचिले
हळुवार भावनांचा
फुलविलास तु पिसारा
गालावरुनी ओघळून आल्या
आनंदी अश्रूधारा
