तुझं प्रेम
तुझं प्रेम
1 min
180
तुझं माझ्यावरील प्रेम म्हणजे ?
गवताच्या पात्यावर पडणाऱ्या
थंडगार दवबिंदू सारखं......
तुझं माझ्यावरील प्रेम...... ?
समुद्रात भरती ओहोटी ला
खळखळणाऱ्या ऊधान लाटे सारखं......
तुझं माझ्यावर प्रेम म्हणजे ?
क्षितिजावर उमलणाऱ्या सूर्याच्या
विखुरलेल्या सूर्यकिरणा सारखं.........
तुझं माझ्यावरील प्रेम.....?
रात्री आकाशात चमचम करणाऱ्या
चांदण्यांची लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं.......
तुझं माझ्यावरील प्रेम म्हणजे ?
वसंतात हिरवाई रोधणा-या
"मार्शल" निसर्ग "प्रणाली" सारखं........
