तुझी मैत्री
तुझी मैत्री
1 min
225
मनात असतं माझ्या ते
ओठावर येत नाही
पण तुझ्या नजरेतून
मात्र तेच सुटत नाही
मनातलं ऐकणारही
कुणी भेटत नाही
तुझ्यापासून लपवाव्यात
गोष्टी तुला पटत नाही
बोललं जरी कटूसत्य
इतरांना रुचत नाही
खोटं मात्र तुझ्यासमोर
स्वप्नातही सुचत नाही
मायेच्या ह्या धाग्यात
सगळेच गुंफत नाही
आयुष्याच्या या माळेत
तुझं स्थान बदलत नाही
दोस्ती च्या या वाटेवर
ऐरेगैरे भेटत नाही
मनातून आवाज देणारे
इतरत्र भोवती कुठेच नाही
तुझी मैत्री नित्य साठवावी
रिती कधीच होत नाही
मैत्रीशिवाय जग स्वप्नातही
मी पाहू शकत नाही
