तुझी माझी भेट
तुझी माझी भेट
1 min
416
तुझी माझी भेट
ही अविस्मरणीय असावी
आठवण आली तिची की
ती पुन्हा तशीच नवी भासावी
वेळी अवेळी कधीही
ती अनपेक्षितपणे घडावी
एकमेकांशी बोलत आपण बरीच
हृदयातली कोडी त्यात उघडावी
दवबिंदूंच्या पडलेल्या सड्यापरी
ओलावा त्या भेटीत असावा
एकमेकांसाठीच्या त्या ओढीत
कोणताच दुरावा नसावा
न तुटणारे ऋणानुबंध
तुझ्या माझ्या भेटीत जोडावीत
तेच बंध आपण अखंड
अविरतपणे आयुष्यभर टिकवावीत...
