तुझे
तुझे
1 min
318
तुझेच सूर अन माझे गीत
जगण्याची लावु ती चाल रीत
तुझेच आलाप माझ्या जिवात
माझेच प्राण तुझ्या ह्रदयात
गाऊ राग दोघे एका सुरात
देहाची पणती प्रेमाची वात
मिळो दोघांची एकमेका साथ
रेशीम धागा ऋणानुबंधात
उजळु दे ज्योत उजळूया रात
सृजनाच्या दिठीत ही चांद रात
उघड गुपित अशी ही बात
तुझे सूर अन माझेच गीत
आळवु आपण हे भावगीत
