STORYMIRROR

Neelima Deshpande

Others

3  

Neelima Deshpande

Others

तुझे नि माझे

तुझे नि माझे

1 min
173

चंद्र, सुर्य मज नकोत काही...

नको तारका, नकोच सागर ;

हात हवा तव आधाराचा, 

हवी तुझी मायेची घागर. 


नको स्वर्गीच राज्य मला

अन गगनातील ती नको चांदणी...

तुज हास्य मज त्याहूनी मोठं ;

ठसून राहील मनी कोंदणी...


देवलोकीचे नकोच अमृत

नको कुणाची तूप नी साखर ; 

गोड मला ती तुझ्या हातची

माळावरची भाजी नी भाकर...  


नकोच मजला उसने वैभव

अन लखलखनार्या दिशा दाही...

मात्र तुझा तो आशिषाचा

शिरी असू दे हातच आई...


साहित्याला गुण द्या
लॉग इन