तुझे लोभस हसणे
तुझे लोभस हसणे
1 min
251
पाहून तुला ग सजनी
अल्लड तुझे बहाणे,
काळजात बाण रुतले
पाहून हे लोभस हसणे.
सुंदर बटा डोळ्यावर
लटकत मनात ठसती,
नजरेचा तीर कमान
जणू घाव मलाच बसती.
नाजूक नार जशी तू
यौवनात फुललेली कळी,
रूप तुझे कोमल सखे
जणू पडले दव हिरवळी.
मधुर गोड तुझे बोल
शब्द मधात विरघळती,
रुमझुम चाल तुझी पडता
नाद घुंगरू चा कानावरती.
