तुझे अस्तित्वात नसताना
तुझे अस्तित्वात नसताना
त्या निळ्याशार आभाळाला
डोळ्यात बंद करून घेताना
मी कल्पेच्या धुक्यात शिरलो
आणि तुला पाहिल्यावर तुझ्या प्रेमातचं पडलो
मी रोज तुझ्याच विचार करायचो
तुझेच स्वप्न बघायचो
तू स्वप्नात येवून भेटायची
आडोसा घेवून बघायची
दुर उभी राहूनच बोलायची
तू स्वप्नात भेटल्यावर
खुप वाटायचं
एकदातरी जवळ येवून बसावं
प्रेमाच हितगुज कराव
हळव्या भावनांना ओजंळीत घेवून
ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवावं
सुखदुःखाची देवाणघेवाण करताना
तुझ माझ नातं घट्ट व्हावं
पण तू जवळ यायची नाही
तुझे असे दुर ऊभे रहाणे मला आवडायचे नाही
स्वप्नातच तुझे माझे असे अंतर ठेवून बोलणे
खुप दिवस चालले
अंतकरणापर्यंत पोहचले
एकमेकांकडे बघताना
तुझ्या माझ्यातला हा दुरावाही नको वाटायचा
काळजावर घाव करायचा
तू स्वप्नातून जेव्हा जायची
तेव्हा मागे वळून बघायची
तुझ्या गालावरची हसरी खळी
माझ्या डोळ्यांना छेडायची
तुझ हसरं रुप पाहून वाटायचं
तू कायमची माझी व्हावी
पण ते शक्य नव्हते
कारण तू अस्तित्वातच नव्हती
तू एक कल्पना होती
विचारातून तयार झालेली आकृती होती
मी फक्त डोळे बंद करून
विचारांच्या गर्दीत विलीन व्हायचो
आणि तुझे स्वप्न बघायचो
तू अस्तित्वात नसताना....
