तुझा चेहरा
तुझा चेहरा
1 min
268
तुझी आठवण येते
तू जवळ नसतांना
तुझाच चेहरा दिसतो
डोळे मिटून असतांना
तुझी किंमत नव्हती
तू जवळ असताना
तुला पाहिलं नाही
डोळे उघडे असताना
हसरा चेहरा दिसे मज
कुणी तरी हसताना
डोळ्यांत अश्रू दाटती
कुणी तरी रडताना
अलगद मिठीत ये तू
सकाळचे स्वप्न पाहतांना
सोडून जाऊ नको तू
तुला विनवणी करताना
