तु मला एवढंच दे......!
तु मला एवढंच दे......!
मला तुझं प्रेम भरभरून दे
तुझ्या हृदयात मला सामावून घे
माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात
तू मला योग्य ती साथ दे.....!
साजणी तुझ्या प्रेमाचा आदर
मी माझ्या आयुष्यात खूप जपेन
अगं प्रिये तुझ्या शपथ त्याची आन
मी माझ्या प्राणाहूनही जास्त जपेन.......!
माझ्या जीवनातील नाजूक कळी तू
त्या कळी भोवती फिरणारं फुलपाखरू मी
कळीच्या त्या सुगंधा करिता मी
किती काळ मागे तुझ्या गं धावू
तुझ्या प्रेमाचा तो सुगंध
माझ्या आयुष्यात दरवळू दे......!
नको घाबरू बिनधास्त बोल
प्रणाली तुझ्या अंतर्मनातील
माझ्या प्रेमाची शपथ घे तू
पण मला तुझ्या आयुष्यात जागा दे.......!
मला तुझ्याकडून काहीही नको गं
फक्त तू माझ्यासोबत लग्न करून घे
आणि तू माझी "मार्शल" धर्मपत्नी बनुन
मी मरेपर्यंत तू माझी साथ दे.....!
