तु एक बिंदू ...
तु एक बिंदू ...
1 min
54
विशाल धरेच्या पात्रातला तु एक बिंदू ,
मी मी करून हिनवतेस स्वतःला तु एक बिंदू ...
आसमंत पांघरूण घालतो समावून चंद्र सूर्य सारे,
तू कोण आहेस ? सांगना तु एक बिंदू ...
समुद्र तो पाण्याने लबलबलेला तरी शुद्र ,
नदी ती धावती तृप्त करी तू सांग तू एक बिंदू ...
वृक्षवल्ली फूलांकित श्वास देई जीवनाला ,
श्वास घेता श्वासांत श्वास येते तुझ्या बोल तु एक बिंदू ...
बघ इथे चौफेर श्रावण म्हणतो का? मी ,
तु अधिर मन सावर कारण फक्त तु एक बिंदू ...
