तत्वनिष्ठ
तत्वनिष्ठ
1 min
333
अहंकारी नाही मी
स्वाभिमानी मात्र आहे
न्यायला प्राधान्य नेहमी
अन्यायाला विरोध आहे
मेहनतीने मिळवते सर्व
डावपेच कधी करत नाही
इतरांचा मारून हक्क
राजकारण करणं जमत नाही
साहित्याशी प्रामाणिक मी
बेईमानी रक्तात नाही
लेखणीने दिला सन्मान मला
समाजात मिळाला मान मला
स्वकर्तृत्वावर उभी मी
आहे भगवंताची साथ
मला खाली काय खेचणार
माझ्यावर तर भवानीचा आशिर्वाद
