STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

ट्रैफिक सिग्नल ( आरती )

ट्रैफिक सिग्नल ( आरती )

1 min
292

जय देव, जय देव, जय सिग्नल देवा

सांगता आम्हाला नियम पाळा...॥धृ॥


पिवळा सिग्नल धाक धुक सदा

हॉर्न वाजवी तो सारखा मागचा

थांबू का जावू? कळेना आता

सद्बुध्दी दे त्या वाहन चालका....॥१॥


हिरवा सिग्नल आनंद दाता

जिंकली लढाई वाटे आता

गेट सेट गो एक्सिलेटर वाढता

तमा नाही कोणाची पुढे जाता....॥२॥


लाल सिग्नल तो असे धोक्याचा

तरी मजा का वाटे हो तोडाया?

घाई देते निमंत्रण अपघाताला

येतील लोक हार फोटो घालाया...॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन