STORYMIRROR

Shalini Wagh

Others

3  

Shalini Wagh

Others

टप्पे जीवनाचे

टप्पे जीवनाचे

1 min
1.9K

बालपणातील मस्ती ,

बोलताना आढळणारे बोबडी भाषा,

बोटांना धरून चालायला शिकण्याची आशा

अन आपल्या आवाजानं

घराला घरपण आणणार ते बालपण||१||


तरुणपणातील मजा काही न्यारी ,

यावेळी लोकही आवडू लागतात प्यारी .

राधा-कृष्णाच्या अभ्यासाची आवड लागलेलं.

बोलायला ही शिकलेलं अन् ..

चालन ही खास जमलेलं .

आवाजात बदल होतोच पण..

आयुष्याचा पुढचा टप्पा गाठण्यात वय पुढे सरकत||२||


मग येतो टप्पा शहाणपणाचा...

तरुणपणातील चुका सुधारण्याचा .

कर्तव्य आणि जबाबदारी च भान,

अन जीवनाचा अर्थ समजण्याचा.

शहाणपण एवढं येतंय की बालपण विसरून जातो||३||


म्हातारपण आणि बालपण समानच

लहानपणी पावसात जाऊ नको म्हणणारी मंडळी आठवते

मग आपणही नातवांना तेच म्हणायचं

त्याच भावना तेच टप्पे पण

म्हणतात ना अनुभवातून नवीन शिकलेल असतं

कुठेतरी मग एका ठिकाणी बसून .,

जीवनाचा आढावा घ्यायचा असतो.

मग गरज असते आधाराची.

पण आवाज मात्र खचलेला असतो||४||


जीवनाची मजा वेगळी असते ,

त्याच रस्त्यावरून पुन्हा पुन्हा जायचं असतं.

बालपणातील आठवणी,

तारुण्यातील मस्ती,

शहाणपणातील विचारांची शिदोरी,

म्हातारपणापर्यंत चे अनुभव घेऊन ऊरी.

असंच चालत राहायचं असतं..

हातातील काठी टेकवत ....

आणि आयुष्याचा टप्पा गाठत


Rate this content
Log in