टोपीवालं पाव्हनं थोडं पुढं सरकून बसा
टोपीवालं पाव्हनं थोडं पुढं सरकून बसा
टोपीवालं पाव्हन थोडं पुढं सरकून बसा
नाहीं जागा तर खाली उतरून चालायला
लागा जुळतं नाहीं तुमच्या संग धागा.....!
टकमक बघतो
लाडात काय येतो
सगळ्या ना उठवून जायला सांगतो
मलाच बसायला सांगतो
यांची काय त्याला मेहुणी म्हणून मला
थांबवायला बोलतो स्टेशन आल्यावर
याचा वचपा बाहेर काढतो उगीच
माझ्या बरोबर जवळीक साधायला
पाहतो गावात कुणी पाहिलं
तर कलंक लावायला मार्ग दावतो.....
कंडक्टरला तिकीट काढू नका
त्यानी पास आणलेला दाखवून
माझ्या पुढं पुढं करतो. नको
तिथं एसटी थांबून लगट करायला
डाव मांडायचा म्हणून पैशाची
मागणी करु लागतो......!
शेवटी न राहून शक्कल लढवली
त्याला मिर्चीचा ठेचा चारून
कानातून धूर डोळ्यातून पाणी
काढून आग आग झाली मंग
पाणी पाणी करून नाचायला
ओरडायला भाग पाडून
पुन्हा नादी लागशील का
दम भरून अखी एसटी हादरून
टाकली......!
