STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

टोपीवाला आणि माकड

टोपीवाला आणि माकड

1 min
561

करीम टोपीवाला निघाला

गावोगावी टोपी विकायला


डोक्यावर असे टोप्याची पेटी

खाकेमध्ये झोळी असे छोटी


चालून चालून थकून गेला

खाण्यासाठी जरा थांबला


झाडाखाली जेवण केला

डुलकी लागली झोपी गेला


माकडे होती त्या झाडावर

खाली उतरली सर सर सर


पेटी उघडून त्यांनी टोप्या घेतली

डोक्यावर लावून मिरवू लागली


करीमला जेव्हा जाग आली

पेटी त्याने रिकामी पाहिली


करीमला खूपच राग आला

दगड घेऊन तो मारू लागला


माकडाने ही लगेच आंबे तोडली

करीमला जोरात मारू लागली


करीम आता पूर्ण हताश झाला

डोक्याची टोपी खाली फेकला


बिचाऱ्या माकडांना कळले नाही

डोक्यावरची टोपी फेकले त्याही


करीम मात्र खूप आनंदी झाला

टोप्या घेऊन गावी चालता झाला


कथा सांगितली आईने गाऊन गाणी

टोपीवाला आणि माकडाची कहाणी


Rate this content
Log in