टोल भरा
टोल भरा
1 min
157
टोल नाका टोल नाका
प्रसंग येता सहज बाका
आयुष्याचा जीवन रस्ता
रोज येतो अडवा बोका
पाप पुण्याला नाही लाज
पोटासाठी नाटकी साज
कोणी अडवा टाकील पाय
वेळीच त्यांना तुम्ही ओळखा
नात्या साठी जीव टाका
त्याच्या साठी वेळ राखा
योग्य वेळी साधा मौका
नजरेतला ओळखा धोका
जगी आपण आहे फिरस्ते
जागच्या जागी असती रस्ते
बदलत जाती प्यादे नुसते
आनंदाचा गुलकंद चाखा
टोल नाका टोल नाका
जीवनात सुख राखा
