STORYMIRROR

Anagha Kamat

Others

3  

Anagha Kamat

Others

टिवी

टिवी

1 min
228

टीव्ही करतो करमणूक 

घरबसल्या माणसांची 

लहानमोठ्यांची रिझवणूक 

इच्छा होते पाहण्याची 


सिनेमा पहा नृत्य पहा 

बातम्या ऐका भाषणं ऐका 

मालिका तर पाहतच रहा 

नव कलात्मक गोष्टी शिका 


शोध संशोधनात रस घ्या 

नाटक नाटिका बघत रहा 

एकाचा कंटाळा आल्यास 

दुसरे चॅनल्स बदलून पहा 


अनेक असतात जाहिराती 

घरबसल्या होतात तिर्थाटने 

नवीन वस्तूंची होते जाण 

जाहिरातींच्या कलाबाजीने 


भविष्यवाणी मिळते ऐकण्यास 

नवनवीन रेसिपी मिळतात 

डॉक्टरांचे आणि वैद्यांचे 

अमूल्य उपदेश कळतात 


व्यायाम, योगासने, प्राणायाम 

ह्यांचा पण होतो अभ्यास 

बायका लवकर उलगून काम 

टीव्ही पुढे बसतात तासनतास 


इंग्रजी शिका, गणित शिका 

पैसे तितके जास्त द्या 

लहान मुलांचे वेगळे चॅनल्स 

गंमत जंमत बघून घ्या


Rate this content
Log in