STORYMIRROR

Raghu Deshpande

Others

3  

Raghu Deshpande

Others

टिप्स..!

टिप्स..!

1 min
185

घाई गडबड जेथें

होई पश्चाताप तेथें

धान्य अनमोल जरीं

थोडे पाखडून घ्यावें...

काय सांगावे पहिला

घासें कंकर टोचलां

गहू चांगल्या प्रतीचा

परि निवडून घ्यावें...

उतावीळपणा भारीं

अंगलट येई तरीं

येतो संबंध जयासीं

व्यक्ती पारखून घ्यावें...

जरीं तहानलीं काया

प्रेमे व्याकुळलीं माया

पाणी पोळलें जयांसी

म्हणतीं फुंकून प्यावें...

फासें असती अपार

करीं सावध विचार

असें लाविलां सापळा

भक्ष निरखून घ्यावें...

मृग चंचल वेगाने

करीं आकृष्ट तेजानें

जणूं मारिच सोनेरी

असें समजून घ्यावें...

साव म्हणतीं सावज

असें आपुला ऐवज

ढोंग रचतीं प्रेमाचें

नीट ओळखून घ्यावें...


Rate this content
Log in