STORYMIRROR

Shila Ambhure

3  

Shila Ambhure

टिल्लू

टिल्लू

1 min
13K


म्याव म्याव करी

मांजरीचे पिल्लू.

बाळाने ठेवले

तिचे नाव टिल्लू.


गोल तिचे डोळे

गोरा गोरा रंग.

छोटे छोटे दात

मऊ मऊ अंग.


दूध आणि दही

गुटुगुटु पिते.

बाळाच्या पायाशी

लुटुलुटु येते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन