टिकटिक
टिकटिक
1 min
272
आयुष्यभराचा खरा, कायम सोबती तू.
काळ कसाही आणी कोणताही असो, वेळ दाखवतोस तू.
सकाळची घाई खूप, भल्या पहाटे ओरडतोस.
वेळेवर जोडणाऱ्यांना, वेळेवर सोड्तोस.
फिरत असतोस सतत, दमत नाहीस केव्हा.
हलकासा आवाज करतोस, शांततेत चालतोस जेव्हा.
राहू केतू काल योग, मुहूर्त पाहतात तूझ्यात.
अंतर जरी असले आपल्यात, तरी तू धडकतोस माझ्यात.
माझ्या पूर्वीही तू होतास, माझ्या नंतरही तू राहणार.
जणू निसर्गाचे कालचक्र तू, निसंदेह टिकटिक चालत राहणार.
