ठळक घटना
ठळक घटना
1 min
435
व्यक्ती असो, समूह असो
समाज असो वा
देशाचा नागरीक असो
त्याच्या स्मरणात असतात
त्या सर्वच घटना
ज्या प्रिय देशाशी संबंधित असतात
कारण अशा घटनांनी
घडवलेला असतो दरवेळी
नवा इतिहास...
म्हणूनच या घटना कायम
ऐतिहासिक घटना होतात
आठवा,
1857 ची लढाई,
भगतसिंग, राजगुरू, आझाद
आणि देशभक्तांचा आझादी-संग्राम
लाल-बाल-पाल यांचा प्रखर लढा
बापूंचा सत्याग्रह, दांडीयात्रा,
चलेजाव चळवळ
आणि 15 ऑगस्ट 1947
देश स्वतंत्र झाला,
नंतर देशाने केलेली चौफेर प्रगती
वैज्ञानिक संशोधन, विज्ञान-प्रगती
हे सारं सारं...
ऐतिहासिकच आहे ना...
